नवीन वर्षात खासदारांची चांदी!
देशाच्या सर्वोच्च कायदेमंडळाच्या सदस्यांना म्हणजे राज्यसभा व लोकसभेच्या खासदारांना घसघशीत पगारवाढ देण्यात आली आहे. यात माजी खासदारांचा सुद्धा समावेश आहे. केंद्र सरकारने नुकतीच याबाबतीतली अधिसूचना काढली आहे. ही पगारवाढ जवळपास २४ टक्क्याने केली आहे. यापूर्वी खासदारांना दरमहा एक लाख रुपये वेतन दिले जात होते, पण आता हे वाढून एक लाख चोवीस हजार होणार आहे. तसेच माजी खासदारांच निवृत्ती वेतन आता २५ हजाराहून थेट ३१ हजार रुपये करण्यात आले आहे. याशिवाय खासदारांना दिल्या जाणाऱ्या दैनंदिन भत्त्यात सुद्धा वाढ झाली आहे.
खासदारांना पगारव्यतिरिक्त अजुन काय मिळतं
१) मतदार संघात खर्चासाठी दरमहा ७० हजार रुपये.
२) कार्यालयीन खर्चासाठी दरमहा ६० हजार रुपये.
३) संसदेच्या अधिवेशनकाळात दैनिक भत्ता २ हजार रुपये.
४) दिल्लीत शासकीय निवासस्थान आणि सोयी सुविधा.
५) काही मर्यादेपर्यंत वीज आणि पाणी मोफत.
स्वातंत्र्यानंतर खासदारांचे वेतन किती होते
देश स्वतंत्र झाल्यानंतर १९५४ पर्यंत संसद सदस्यांना ४५ रुपये दैनिक भत्ता दिला जायचा,याशिवाय इतर काही भत्ते होते.
१९५४ मध्ये भारत सरकारने वेतन, भत्ता आणि निवृत्ती वेतन बाबत कायदा केला. त्यानुसार खासदारांचे वेतन दरमहा ४०० रुपये ठरवण्यात आले. याशिवाय इतर भत्ते लागू होते.
